आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pok Man An Indian, Maha Tells Hc Opposing Deportation Plea ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकव्याप्त काश्मिरातील माणूस हा भारतीय : न्यायालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय राज्यघटनेनुसार पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सिराज खान हा भारतीय नागरिक ठरतो, असे सांगत त्याच्या विरोधात पासपोर्ट आणि परदेशी नागरिक कायद्यान्वये यापूर्वी नोंदवण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात येणार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाला सादर केले. यासंदर्भात पुढील आठवड्यात आपले म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
मूळचा पाकव्याप्त काश्मिरातील असणारा सिराज खान विविध गुन्ह्यांसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. आपली मायदेशी परत पाठवणी करावी, या मागणीसाठी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर व न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अनेक वर्षांपासून विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या राहणा-या सिराजवरून न्यायालयाने राज्य सरकारची मागील सुनावणीच्या वेळी कानउघाडणी केली होती. तसेच, अशा नागरिकांसंदर्भातील आपले धोरण सुस्पष्टपणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅडव्होकेट जनरल दरायस खंबाटा यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले.