आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकी वर्दीवर डाग : अंबरनाथमध्ये पोलिसाचा सहकारी पोलिसाच्या पत्नीवर बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अंबरनाथमध्ये एका पोलिसाने सहकारी पोलिसाच्याच पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
 
पीडित महिला अंबरनाथमध्येच राहते. तिचा पती आणि पतीचा मित्र असलेला आरोपी योगीराज वाघ हे दोघेही ठाणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. या वर्षीच्या जानेवारी ते मे महिन्यादरम्यान आरोपी वाघने वारंवार मित्राच्या पत्नीला फोन करुन त्रास दिल्याचा आरोप आहे.
मित्राच्या अनुपस्थितीत घरी जाऊन त्याच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याचा आरोपही आहे. अखेर याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. आरोपी योगीराज वाघ हा सध्या भिवंडीजवळच्या पडघा पोलिस ठाण्यात कार्यरत असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
 
या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे अंबरनाथचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पाटील यांनी सांगितले आहे. मात्र या प्रकाराने पोलिसांच्या वर्दीवर डाग पडल्याची चर्चा होत आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...