आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी मागणा-या सोलापूरच्या शेतक-यांची उचलबांगडी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यासाठी उजनी धरणाचे पाणी सोडावे, या मागणीसाठी सुमारे 70 हून अधिक दिवस आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विधिमंडळाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना रोखले.

सरकार दरबारी मागण्यांचा विचार होत नसल्याने संतप्त झालेल्या देशमुख व कार्यकर्त्यांनी यापूर्वी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी त्यांनी विधिमंडळाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांमध्ये महिलांचाही समावेश होता, त्यांनाही पोलिसांच्या लाठ्यांचा ‘प्रसाद’ खावा लागला. एका तरुण शेतक-याने झाडावर चढून पोलिसी कारवाईचा निषेध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला खाली उतरण्यास भाग पाडले. या शेतक-याने झाडावरून उडी घेतल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.