आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैधरित्‍या गोवा बनावटीची दारु बाळगल्याप्रकरणी एकास अटक, सिंधुदुर्गातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैभववाडी- आराम बसमधून अवैधरित्या गोवा बनावटीची दारु घेऊन जाणाऱ्या त्रिनाथ वासुदेव बेहेरा (वय २९) या प्रवाशाला वैभववाडी पोलीसांनी गुरुवारी रात्री अटक केली आहे. त्याच्याकडून 2 हजार 800 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्‍यात आली आहे. पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वैभववाडी येथील संभाजी चौकात केली.
 
वैभववाडी संभाजी चौकात वैभववाडी पोलीसांनी गुरुवारी रात्री नाकाबंदी केली होती. यादरम्यान गोव्याहून पुण्याकडे जाणारी पावलो ही आराम बस  वैभववाडी संभाजी चौकात आली असता पोलिसांनी बसची तपासणी केली. यावेळी बसमधील प्रवासी त्रीनाथ बेहेरा याच्याकडील पिशवीत गोवा बनावटीच्या दारुने भरलेल्या चार बॉटल आढळल्‍या. यांची किंमत २ हजार आठशे रूपये असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
यानंतर वैभववाडी पोलिसांनी श्रीनाथ याला अटक केली. अवैध दारु बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी त्याला कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...