आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांना लागली ‘नेतेगिरी’ची चटक, ज्युलियो रिबेरो यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर पोलिस दल सतर्क झाल्याचे नाटक करून चौकशीचा बनाव करत आहेत. मात्र, पोलिसच आता नेत्यांसारखे मिरवत असल्याने असे प्रकार होत असल्याची टीका माजी पोलिस महासंचालक ज्युलियो रिबेरो यांनी केली.


रिबेरो म्हणाले, वाढत्या गुन्हेगारी घटनांसाठी पोलिस उदासीनता दाखवत असल्याने न्यायालयात लवकर निपटारा होत नाही. सरकारही या मुद्द्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. नेत्यांना केवळ आपलीच चिंता आहे. मालदार पदे मिळवण्यासाठी पोलिसांनी राज्यकर्त्यांकडे स्वत:ला गहाण ठेवले आहे. तसेच पोलिसांना आपले काम सोडून इतर कामातच अधिक रस आहे. सध्या पोलिस ठाण्यात जर कोणी तक्रार घेऊन आले तर त्यांच्याकडून पोलिस पैसे वसूल करतात. त्यानंतर आरोपींना पकडून त्यांच्याकडून वेगळीच वसुली करतात. त्यामुळे दोन्ही बाजूंनी लूट सुरू आहे. वरिष्ठांच्या कारवाईचा पोलिसांना अजिबात धाक राहिला नसल्याचेही ते म्हणाले.

गुंडांनाही धाक नाही
आपल्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला तरी पोलिस आपले काहीही वाकडे करू शकत नसल्याचा विश्वास गुंडांना आहे. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यातील गुन्हेगारी घटनांत मोठी वाढ होत आहे. सध्या जशी स्थिती आहे ती 35 वर्षांपूर्वी अजिबात नव्हती. या व्यवस्थेत बदल करायचा असल्यास पहिल्यांदा पोलिसांच्या बदल्यात राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप व्हायला नको. जे अधिकारी अधिक सक्षम आहेत, त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली पाहिजे. मात्र, अशा अधिका-यांना खोट्या प्रकरणांत फसवले जात असल्याचेही ते म्हणाले.