आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"राष्ट्रगीत गायन : अमिताभ बच्चन यांच्याविराेधात पाेलिसात तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोलकाता येथे भारत आणि पाकिस्तान झालेल्या ट‌्वेंटी-२० क्रिकेट सामन्यादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांनी सदाेष राष्ट्रगीत गायन केल्याची तक्रार दिल्लीच्या अशोकनगर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. ५२ सेकंदांऐवजी १ मिनिट २० सेकंदांत बच्चन यांनी राष्ट्रगीत पूर्ण केले. तसेच त्यात अनेक चुकाही केल्याचे लघुपट दिग्दर्शक उल्हास पी. आर. यांनी तक्रारीत म्हटले अाहे.
या तक्रारीची प्रत पंतप्रधान कार्यालयालाही पाठवली आहे. अमिताभ अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीत गातात. १९ मार्चच्या सामन्यादरम्यान राष्ट्रगीत गाताना त्यांनी अनेक चुका केल्या. यात "दायक' शब्दाऐवजी "नायक', तर ‘सिंधू’ऐवजी "सिंह' शब्दाचा वापर केला, असा अाराेपही तक्रारीत करण्यात अाला अाहे.

पैसे घेतल्याचाही आरोप
ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यादरम्यान अमिताभ यांनी राष्ट्रगीत गाण्यासाठी चार काेटी पैसे घेतल्याचा आरोपही अाधी करण्यात आला आहे. मात्र, बंगाल क्रिकेट संघटनचे अध्यक्ष साैरव गांगुलीने बच्चन यांनी पैसे घेतले नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, याच सामन्यादरम्यान पाकिस्तानी गायक शफाकत अली यानेही चुकीचे राष्ट्रगीत म्हटल्याची टीका हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...