आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा कुंपनच खातं शेत...पोलिस कॉन्स्टेबलचा बारमध्ये धुडगूस, मॅनेजरला मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाण्यातील कळवा येथील सायबा बार आणि रेस्तरॉमध्ये पोलिस कॉन्स्टेबलने धुडगूस घालून मॅनेजरला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवीण संके असे पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. संके याने कॅशियर आणि मॅनेजरला बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे हे प्रकरण?
- ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वीची आहे.
- हॉटेल मालकाने पोलिस आयुक्तालय, उपायुक्त, एसीपी, कळवा पोलिस ठाणे आणि हॉटेल असोसिएशनकडे तक्रार नोंदवली आहे.
- पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती हॉटेल मालक उमेश करकरेंनी दिली आहे.

जेव्हा कुंपनच शेत खातं...
- प्रवीण संके हा हॉटेलमध्ये दारू प्यायला. नंतर जेवणही केले. त्याचे बिल 2 हजार 200 रुपये झाले होते.
- वाढीव बिल कमी करा व डिस्काउंट द्या, यावरुन त्याने वाद घातला.
- त्याने बार मॅनेजर आणि कॅशियरला मारहाणही केली.
- बारच्या बाहेर पडताना देखील याची अरेरावी सुरुच होती.
- ही घटना बारमध्ये आणि बाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...