आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारमध्ये बसून दारू पित होता पोलिसवाला, वेटरने पैसे मागताच असे केले हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅश काऊंटरवर मॅनेजरला मारहाण करताना पोलिस कर्मचारी... - Divya Marathi
कॅश काऊंटरवर मॅनेजरला मारहाण करताना पोलिस कर्मचारी...
मुंबई- ठाणे शहरातील एका पोलिस कॉन्स्टेबलची गुंडागर्दी कॅमे-यात कैद झाली आहे. येथे एका कॉन्स्टेबलने एका बारमध्ये घुसत तेथील मॅनेजर आणि कॅश काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीला मारहाण केली. कमे-यातील पोलिसाचे कृत्य पाहून वरिष्ठ अधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. बार मालकाने या घटनेची तक्रार करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. दारू पिल्यानंतर बिलात सूट मागण्यावरून झाला वाद.....

- मिळालेल्या माहितीनुसार, कळवा येथील सायबा बार आणि रेस्टांरंटमधील ही घटना 27 ऑगस्टची आहे. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 
- या व्हिडिओत पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण संखे बार मॅनेजर आणि कॅश काउंटरवर बसलेल्या एका युवकाला जबरदस्त मारहाण करताना दिसत आहे. 
- 27 ऑगस्टला कॉन्स्टेबल प्रवीण संखे कळव्यातील सायबा बारमध्ये बसून दारू पित होता. त्यावेळी तो सुमारे 2200 रुपयांची दारू पिला.
- जेव्हा वेटरने त्याच्या टेबलवर बिल पोहचवले तेव्हा पोलिस त्यावर डिस्काउंट मागू लागला. मात्र, बार मॅनेजरने त्याला नकार दिला.
- बिलावर डिस्काउंट न दिल्याने भडकलेल्या कॉन्स्टेबल प्रवीण संखेने कॅश काउंटरवर बसलेल्या व्यक्तीला आणि मॅनेजरला दारूच्या नशेत जबरदस्त मारहाण करण्यास सुरुवात केली. कॉन्स्टेबलच्या या कृत्यामुळे वेटर घाबरून गुपचूप उभा राहिला होता.
- या घटनेनंतर बारचा मालक उमेश करकेराने कॉन्स्टेबल प्रवीण संखेविरोधात पोलिस कमिश्नर ऑफिस, कळवा पोलिस स्टेशन आणि सीएम फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, आतापर्यंत या कॉन्स्टेबलवर कोणतेही कारवाई झालेली नाही.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेतील छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...