आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Constable Died In Bandra Hit And Run Accident

मुंबईत वेगाने घेतला पोलिसाचा बळी, कारच्‍या धडकेत कॉन्‍स्‍टेबलचा मृत्‍यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत वांद्रे येथे एका भरधाव कारने पाच जणांना उडविले. त्यात रात्रपाळीत काम करणा-या एका पोलिसाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

वांद्रे रेक्लेमेशन येथे शुत्रवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भरधाव वेगातील होंडा सिटी कारने एक ऑटोरिक्षा आणि एका दुचाकीला धडक दिली. रिक्षा चालकासह त्‍यात बसलेले तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. तर दुचाकीला बसलेल्या जोरदार धडकेत पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला. हनुमंत फाळके असे मृत पोलिसाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी होंडा सिटी कारचा चालक अँड्र्यू स्टिव्हन (26) याला ताब्यात घेतले आहे.