आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचारी संतोष शिंदे यांचा अखेर मृत्यू, खड्ड्याचा आणखी एक बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील विले पार्ले पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेत कार्यरत असलेले संतोष एकनाथ शिंदे (42 वर्षे) यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिंदे यांना एक मुलगा विघ्नेश (13 वर्षे), एक मुलगी सई (8 वर्षे), पत्नी वैशाली (38 वर्षे) आणि आई असा परिवार आहे.
 
संतोष शिंदे मागील आठवड्यात 31 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी मुंबईवरून नेरुळ येथे आपल्या मोटार सायकल (mh 43 w 4699) वरून जात होते. त्यावेळी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास वाशीतील सिग्नलजवळील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्यामुळे घसरून पडले.
 
रात्रीची वेळ असल्याने व अंधारामुळे तेथे खड्डा असल्याचे शिंदे यांना दिसले नाही त्यामुळे हा अपघात झाला होता. या अपघातात शिंदे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर त्यांच्यावर वाशीतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
दरम्यान त्यांच्यावर आज सायंकाळी त्यांच्या मूळ गावी आसगाव (सातारा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

शिंदे यांची मुंबई पोलीस दलातील कामगिरी-
 
- 1996 मध्ये पोलीस दलात भरती. बक्कल क्रं 960070

- मा. पोलीस आयुक्त यांचे कडून बेस्ट डिटेक्शन म्हणून 4 वेळा गौरविण्यात आले
.
- मा. पोलीस आयुक्त यांचे कडून इतर 20 बक्षिसे अशी एकूण गुन्हे उघडकीस व गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करण्यासाठी 128 पोलीस बक्षीसे.
 
बातम्या आणखी आहेत...