आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईची हत्या करणाऱ्या सिद्धांत गणोरेला 2 जूनपर्यंत पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वत:च्याच आईची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करणारा, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांचा मुलगा सिद्धांत याला न्यायालयाने शुक्रवारी २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हत्या करुन घरातून दाेन लाख रुपये घेऊन फरार झालेल्या सिद्धांत याला गुरुवारी जोधपूर येथून अटक करण्यात पाेलिसांना यश अाले हाेेत.

शुक्रवारी सकाळी त्याला बांद्रा न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करायची असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्याला २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मंगळवारी रात्री त्याने आपली आई दीपालीची धारदार शस्त्राने हत्या केली होती. त्यानंतर फरार झाला होता. पोलिसांनी त्याला जोधपूर येथून अटक केली. ज्ञानेश्वर गणोरे सध्या खार पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.  त्यांच्याकडे बहुचर्चित शिना बोरा हत्याकांडाचा तपास आहे.
बातम्या आणखी आहेत...