आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Do Corruption Due To Less Salary, R.R. Patil New Research

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमी पगारामुळेच पोलिस भ्रष्टाचार करतात, आर आर आबांचा अजब युक्तिवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘कमी पगार असल्यामुळेच पोलिस पैसे घेतात,’ असा अजब युक्तिवाद गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. त्यावर भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी आक्षेप घेतला. ‘हजारो रुपये वेतन असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी भ्रष्टाचार करतात,’ असे सांगत बापट यांनी भ्रष्टाचाराचे कदापिही समर्थन होऊ शकत नसल्याचे आबांना ठणकावून सांगितले. त्यावर घूमजाव करत आपण भ्रष्टाचाराचे समर्थन करत नसून, दुसरी बाजू मांडल्याचा खुलासा आबांनी केला.


विरोधकांतर्फे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पाटील यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, बाळा नांदगावकर, राम कदम व अनिल गोटे यांनी केलेल्या टीकेची सव्याज परतफेड केली. कदम यांच्यावर निशाणा साधताना गृहमंत्री पाटील म्हणाले की, औरंगाबादमध्ये पोलिसांवर हल्ला झाला, तिथेही आमदार तुमचाच होता. मुंबईत हल्ला झाला, तेव्हाही आमदार तुमचाच निघाला. संधी मिळेल तेव्हा पोलिसांना मारू नका. तुमच्या भाषणाची प्रत जर सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना दाखवली, तर तोदेखील झाले गेले विसरून जाईल, पण भाषण आणि कृतीमध्ये मेळ साधा.काठीला सोने बांधून कुठेही फिरता येईल, असे आश्वासन आपण दिल्याचे विरोधकांतर्फे वारंवार सांगण्यात येते, पण आपल्या या वाक्याचा भावार्थ लक्षात घ्यावा.

राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली असल्याचे आपल्याला म्हणायचे होते, पण तरीही ठीक आहे. राज्यात लोक काठीला सोने बांधून नव्हे, तर अंगावर सोन्याचे कपडेच घालून फिरत आहेत. तुम्ही जळगावपर्यंत काठीला सोने बांधून जा. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेऊ, असा चिमटा त्यांनी खडसे यांना काढला. आपण गुन्हेगारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू, असे आपण एकदाच म्हणालो होतो, पण विरोधकांनी ती घोषणा इतक्या वेळा उच्चारली की, ‘जय जवान जय किसान’ साठी जसे लालबहादूर शास्त्रींचे नाव घेतले जाते, तसे कोपरापासून ढोपरापर्यंत म्हटले की माझे नाव घेतील.