आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या नेत्यावर पाेलिसाचा गोळीबार, पीआयने जुन्या वादातून चालवली गोळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - वर्षभरापूर्वी लाच घेताना केलेल्या चित्रीकरणाचा राग मनात धरून ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मदन दराडे यांच्यावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या चित्रीकरणामुळे संबंधित पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते. कल्याणमधील आधारवाडी परिसरात घडलेल्या या घटनेतून दराडे थोडक्यात बचावले. भीमराव घाडगे असे गाेळीबार करणाऱ्या पोलिस निरीक्षकाचे नाव असून तो ठाणे पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहे.
एक वर्षभरापूर्वी एका प्रकरणात मदन दराडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातून त्यांचे नाव वगळण्यासाठी पाेलिस निरीक्षक भीमराव घाडगेने एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार पैसे देण्याचे दराडे यांनी कबूल केले . मात्र हे पैसे घेताना दराडे यांनी घाडगे यांचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण केले होते. तसेच त्यांनी ही चित्रफीत वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली हाेती. त्याचा परिणाम म्हणजे घाडगेंना निलंबित करण्यात अाले होते. हा राग मनात धरून घाडगेने गुरुवारी मध्यरात्रीच्या वेळी दराडे यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबार झाला त्या वेळी दराडे हे त्यांच्या कारमध्ये असल्याने थोडक्यात बचावले. घटनास्थळावरून गोळीची पुंगळी जप्त करण्यात आली असून बाजारपेठ पोलिस ठाण्यात घाडगेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गृहखात्यावर सरकारचा अंकुश नाही : डावखरे
मदन दराडे यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ही घटना अत्यंत दुःखदायक आणि लांच्छनास्पद असून कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचवणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असूनसुद्धा अशा घटना घडत असतील तर या सरकारला काय म्हणावे? सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्याची टीकाही त्यांनी केली.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...