आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँची पुन्हा 25 मिनीटे चौकशी, कांदिवली पोलिसांनी विचारले 23 प्रश्‍न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वयंभू आध्यामित्क गुरू राधेमाँ ऊर्फ सुखविंदर कौर यांची कांदिवली पोलिसांनी बुधवारी पुन्हा सुमारे २५ मिनिटे चौकशी करत त्यांना २३ प्रश्न विचारले. यात त्यांची संपत्ती, पती आणि पासपोर्ट आणि इतर प्रश्न विचारण्यात आले. निक्की गुप्ता या महिलेने राधेमाँविरोधात तक्रार देत आपल्या सासरच्या मंडळींना हुंडा घेण्यास प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी राधेमाँला "डॅडी' या व्यक्तीबाबत विचारणा केली, त्यावेळी ते आपले पती असल्याचे तिने सांगितले. मात्र, चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या पासपोर्टबाबत काहीही माहिती दिली नाही. तसेच आपल्या नावावर संपती नसल्याचे सांगितले. गुप्ताने लावलेले आरोप फेटाळत आपण कोणालाही हुंडा घेण्यासाठी प्रवृत्त केले नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गरज पडल्यास राधेमाँना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.