आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस पदकांची घोषणा; राज्यातील 12 जणांना शौर्य, 56 पोलिसांना राष्ट्रपती पदके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोलिस विभागाच्या राष्ट्रपती पदकांची घोषणा झाली असून राज्यातील ५६ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपदी पदक मिळाले आहे. यामध्ये तीन कर्मचाऱ्यांना विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल, १२ जणांना शौर्य पदकाने, तर ४१ जणांना विशेष सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे.  

विशेष उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक आयुक्त दिनेश अहिर, नाशिकच्या विशेष शाखेचे सहाय्यक निरिक्षक मुजफ्फर सैय्यद आणि सांगलीच्या वाहतुक शाखेचे सहाय्यक निरिक्षक सुरेंद्रनाथ आवळे यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. तर अतिरिक्त पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, सहाय्यक आयुक्त अंकूश माने, हेडकॉन्स्टेबर मल्लेश केडमवार, मोतीराम मडवी, नायक जितेंद्र मारगाये, गजेंद्र सौंजाळ, उपनिरिक्षक दत्तात्रेय काळे, प्रफुल्ल कदम, विजय रत्नपारखी, प्रमोद भिंगारे यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने गौरवण्यात आले आहे. डोगे अत्राम आणि स्वरुप अमृतकर या दोघांना मरणोपरांत शौर्य पदकाने गौरवण्यात येणार आहे. या शिवाय राज्य राखीव पोलिस दल, औरंगाबादचे महानिदेशक निसार तांबोळी, औरंगाबाद शहरचे सहाय्यक आयुक्त नागनाथ कोदे यांच्यासह तब्बल ४१ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे.
 
शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्यांची नावे
1) के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्न, अतिरिक्त पोलिस आयुक्त, मुंबई
2) प्रसाप सिंह पाटणकर, विशेष पोलिस महासंचालक, नागपूर परीक्षेत्र
3) केशव पाटील, डीआयजी, एसीबी, मुंबई
4) अंकुश शिंदे - अतिरिक्त पोलिस आयुक्त, नागपूर
5) बाळ श्रीराम गाईकर, डीसीपी, पुणे
6) डॉ. प्रभाकर बुधवंत, एसपी, पुणे
7) अनिल कुंभारे, डीसीपी, मुंबई
8) महेश घुर्ये, कमांडंट एसआरपीएफ, मुंबई
9) दिलीप सावंत, डीसीपी, मुंबई
10) राजेंद्र डहाळे, एसपी, नंदुरबार
11) निसार तांबोली, कमांडंट एसआरपीएफ, औरंगाबाद 
बातम्या आणखी आहेत...