आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुदुर्गत फिरते कँन्टीन सुविधा सुरु, पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांची संकल्पना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैभववाडी पोलिस स्टेशनमध्ये फिरते कँन्टीन. छाया- पंकज मोरे, वैभववाडी जि. सिंधुदुर्ग - Divya Marathi
वैभववाडी पोलिस स्टेशनमध्ये फिरते कँन्टीन. छाया- पंकज मोरे, वैभववाडी जि. सिंधुदुर्ग
वैभववाडी- सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या सुविधेसाठी प्रायोगिक तत्वावर 'फिरते कँन्टीन सुविधा' सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सुविधा जिल्ह्यात वैभववाडीत सुरु झाली आहे.

या सुविधेमध्ये पोलिसांना सर्व जीवनावश्यक वस्तूंवर 20 ते 50 टक्के सूट देण्यात येत आहे. येथील कर्मचाऱ्यांनी जवळजवळ 20 हजार रुपयांची खरेदी केली. ही सुविधा ओरोस येथे कार्यान्वित आहे. मात्र कामाच्या व्यापातून ओरोसला जाणे पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे नूतन पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या संकल्पनेतून ही सुविधा जिल्हाभरात सुरु करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, वैभववाडी पोलिस स्टेशनमध्ये फिरते कँन्टीनचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...