आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Officer Beaten By MLAs In The Assembly Building In Maharashtra

अटक टळली; क्षितिज ठाकूर, राम कदम गुरुवारी पोलिसांना शरण जाणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोलिस अधिकारी मारहाण प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या आमदारांच्या अटकेची तयारी गृहखात्याने केली होती. गुन्हे शाखेचे अनेक वरिष्ठ अधिकारी विधानभवन परिसरात दाखलही झाले होते निलंबित आमदारांची अटक टळली असून राम कदम आणि क्षितिज ठाकूर हे गुरुवारी स्वतःहून अटक होणार आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी विधानभवनात आले, तेव्हा त्यांच्यातील दोन पोलिस अधिकार्‍यांकडे प्रवेशपत्र नव्हते. या मुद्‍द्यावरून विधान भवनातील आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. या आक्षेपाची विधानसभा अध्यक्षांनी दखल घेऊन पोलिस आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. त्यामुळे निलंबित आमदारांची अटक टळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नालासोपारा येथील आमदार क्षितीज ठाकूर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राम कदम यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच्यासह 14 जणांवर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच आमदार नऊ महिन्यांसाठी विधिमंडळाने पोलिस अधिकार्‍याला मारहाणप्रकरणी आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या पाच आमदारांवर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर विधिमंडळ परिसरात येण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे हे पाचही आमदारांना विधिमंडळाच्या आगामी पावसाळी व हिवाळी अधिवेशनालाही मुकावे लागणार आहे. क्षितिज ठाकूर, राम कदम, जयकुमार रावल, प्रदीप जैस्‍वाल आणि राजन साळवी यांना 31 डिसेंबर 2013पर्यंत निलंबित करण्‍यात आले आहे. उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी राज्‍याचा अर्थसंकल्‍प सादर केल्‍यानंतर विधानसभा अध्‍यक्षांनी लागलीच ही कारवाई केली. कारवाईची माहिती संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. निलंबन पुरेसे नाही विधानसभा सदस्यांच्या सभागृहातील अनुचित प्रकाराबद्दलही त्यांच्यावर या पेक्षा कठोर कारवाई केली जाते. असे असताना, केवळ नऊ महिन्यांचे निलंबन हे कारवाईच्या नावाने जनतेची दिशाभूल असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदारांवर मंगळवारी गुन्हा दाखल झालेला असताना त्यांना अटक का करण्यात आली नाही? अशी विचारण्या माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंग यांनी केली आहे. तर, काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी कारवाईचे समर्थन केले आहे. पुढील स्लाईडमध्ये वाचा, गृहमंत्र्यांनी घेतली सूर्यवंशींची भेट. सी लिंकवर आमदार ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्यात काय वाद झाला पाहा व्हिडिओ.