आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Encounter specialist दया नायक यांची नागपूरला तडकाफडकी बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी मुंबई पोलिस दलात ख्याती असलेले पोलिस अधिकारी दया नायक यांची पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार, नागपूर परिक्षेत्र (ग्रामीण) येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पोलीस सेवेतून निलंबित केलेले दया नायक हे नुकतेच पुन्हा सेवेत रूजू झाले आहेत. दया नायक सध्या ते पश्‍चिम प्रादेशिक विभागात नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावत आहेत.
नियंत्रण कक्षात दया नायक कार्यरत असले तरी त्यांच्या नावामुळे त्यांचे आजही अनेक चाहते आहेत. पोलिस दलातही त्यांची वट आहे. मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. नांगरे-पाटील हे वरिष्ठ असले तरी त्यांच्याकडून मुंबईतील अंडरवर्ल्डचे धडे घेतात. दया नायक यांना मुंबईतील सगळी 'दुनिया' माहित आहे. मात्र, त्यांची अचानकपणे तडकाफडकी नागपूरला बदली करण्यात आल्याने पोलिस दलात चर्चा रंगू लागली आहे. दया नायक यांच्याशी संपर्क साधला असता आपण सध्या सुट्टीवर असल्याचे सांगितले. याबाबत मला वरिष्ठांकडून काहीही माहिती दिली गेली नाही असे म्हटले आहे.
पुढे वाचा, दया नायक यांच्याबाबत...