आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीडितेभोवती पोलिसांचे कवच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत अत्याचार झालेल्या पीडितेची प्रकृती आता स्थिर असून ती उपचारांना पूर्णपणे प्रतिसाद देत आहे. शनिवारी तिने कुटुंबीयांशी संवादही साधला. मात्र, या तरुणीला कोणी भेटू नये, तसेच याबाबतची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी जसलोक रुग्णालयात 30 पोलिस दोन पाळ्यांमध्ये तैनात करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

पीडित तरुणी उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती जसलोक रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. तरुण ग्यानचंदानी यांनी शनिवारी प्रसिद्धिमाध्यमांना दिली. रुग्णालयात पीडित तरुणी असणा-या खोलीच्या दरवाजावर 15 पोलिस आहेत. पीडितेला किंवा तिच्या कुटुंबीयांना कोणालाही भेटू द्यायचे नाही, अशी त्यांच्यावर जबाबदारी आहे. जसलोक रुग्णालयाच्या नर्सेस आणि कनिष्ठ डॉक्टरांना पीडितेच्या खोलीत जाण्यास मनाई आहे. तेथे वरिष्ठ व खासगी नर्स तैनात केल्या आहेत. उपचारासाठी वरिष्ठ महिला डॉक्टरांची नेमणूक केली असल्याचे सूत्रानी सांगितले. कार्यकारी अधिका-यांच्या लेखी परवानगीशिवाय माध्यमांच्या प्रतिनिधींनाही रुग्णालयात प्रवेशास मनाई आहे.