आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Raid 'gay' Party; 30 Booked For Indecent Behaviour

मुंबईत मालाड परिसरात पोलिसांनी 'गे' पार्टी उधळली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालाड परिसरात एका बंगल्यात सुरू असलेली गे पार्टी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री उधळून लावली. या पार्टीत सहभागी झालेल्या एकूण 30 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, मढ किनार्‍यावरील एका बंगल्‍यात ही पार्टी सुरु असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यावरुन पोलिसांनी धाड टाकली. पार्टीमध्‍ये अनेक जण अश्लिल हावभाव आणि नृत्‍य करीत असल्‍याचे आढळून आले. अतिशय मोठ्या आवाजात डीजे संगीत सुरु होते. पार्टीमध्‍ये 6 तृतीयपथींनाही ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. पोलिसांना घटनास्‍थळी अमली पदार्थ सापडले नाहीत.
सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तन, मुदतीनंतर कर्कश संगीत वाजविणे या गुन्ह्यान्वये ही कारवाई करण्यात आल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

(फाईल फोटो)