आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस भरतीचा तिसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये : राम शिंदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील पोलिस भरतीचा तिसरा टप्पा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होत अाहे. यात १२ हजार पोलिस शिपायांची पदे भरण्यात येतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.
पोलिस दलात आमूलाग्र सुधारणा करण्याचा आमचा विचार असून मनुष्यबळ वाढविणे हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. यापूर्वी आघाडी सरकारने ६० हजार पदे भरण्यास सुरुवात केली होती परंतु त्यापैकी फक्त २४ हजार पदेच भरण्यात आली. त्यामुळे पोलिस भरतीचा तिसरा टप्पा आम्ही ऑक्टोबरपासून सुरु करणार आहोत. मुंबईतील मानखुर्द परिसरातील ५५ एकर जागेवर नवा तुरूंग उभारण्यास राज्य सरकारने सोमवारीच मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...