आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM च्या सौभाग्यवतींचा औरंगाबादकरांनी अनुभवला सूर; पोलिसांनी विकली \'लाइव्ह कॉन्सर्ट\'ची तिकीटे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एमजीएम पोलिसांच्या वतीने आयोजित संगीत रजनीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांचे गायन झाले. 'संधी मिळेल तेव्हा समाज, देशाच्या मदतीसाठी पुढे या', असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अमृता यांच्या लाइव्ह कॉन्सर्टच्या तिकिटाचे मुल्य सुमारे 51000 रुपये आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला ड्रेसकोडही होता.

मात्र, या कार्यक्रमासाठी 51000 रुपयांची तिकिटे पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांना जबरदस्तीने विक्री केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता राखल्याने गृहखात्याच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. औरंगाबाद पोलिसांपैकी एक वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, लाइव्ह कॉन्सर्टची तिकीटे विक्री करण्‍याचे 15 पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आदेश मिळाले होते. शहरातील बडया उद्योगपतींना या कार्यक्रमाचे तिकीटे विक्री करण्यात आल्याची माहिती समजते.

अमृता फडणवीस या 'पोलिस रजनी' कार्यक्रमाच्या सद्भावना दूत आहेत. विशेष म्हणजे त्या या कार्यक्रमात कलाकार म्हणून सहभागी झाल्या होत्या. 'भारतीय स्वातंत्र्य' अशी या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती. संगीत दिग्दर्शक मिथुन शर्मा, शान, गायक के. के पलक मच्चल, अमृता फडणवीस, हास्यकलाकार राजू श्रीवास्तव, बजरंगी भाईजान फेम बाल कलाकार हर्षाली मल्होत्रा, शरद कपूर, युविका चौधरी, अमिषा पटेल, गजेंद्र वर्मा, मोहंमद इरफान, अल्तमश फरिदी यांनी आपली कला सादर करून औरंगाबादकरांनी मने जिंकली. नताश सुरी यांनी सूत्रसंचालन केले.

प्रत्येक पोलिस ठाण्याला होते दहा तिकीटांचे टार्गेट...
या कार्यक्रमाला शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यांना दहा तिकीटांचे टार्गेट देण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा व एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यांना 25 तिकीटांचे टार्गेट देण्यात आले होते.

काय म्हणाले पोलिस आयुक्त...?
कर्करोग रुग्णांना तसेच आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना तसेच पोलिसांच्या मुलांना आर्थिक मदत म्हणून हा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याने पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... अमृता यांनी तीन गाणी सादर करून रसिकांकडून अशी मिळवली दाद...  
बातम्या आणखी आहेत...