आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्याने तिच्याकडे केली शरीरसुखाची मागणी, ती म्हणाली लग्न कर मग घडले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शरीरसुखाची मागणी केल्यावर प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने दगडाने ठेचून खून केल्याची घटना अंबरनाथ येथे घडली. विशाल कदम असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर कविता पाटोळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

अंबरनाथ पूर्व येथील म्हाडा सर्कल परिसरात 3 दिवसांपूर्वी एका मैदानातील झाडाझुडपात कविताचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता. खुनाचा हा प्रकार उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले. कविता पाटोळे ही अंबरनाथ येथील महालक्ष्मी नगर परिसरात आपल्या दोन मुलांसह राहत होती. तर आरोपी विशाल कदम हा रिक्षाचालक असून त्याचे दीड वर्षापासून कवितासोबत प्रेमसंबंध होते. 3 दिवसांपूर्वी त्याने कविताला फिरायला निर्जनस्थळी नेऊन झाडाझुडपाच्या ठिकाणी बसवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. यावेळीही तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र प्रियकर विशालने तिला नकार दिल्यावर त्यांच्यात वादविवाद झाला. त्यावेळी विशालने चिडून कविताच्या डोक्यात दगड घातला व तिचा खून केला.  पोलिसांनी आरोपी विशाल कदमला अटक केली असून त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनिल जाधव करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...