आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गटारीच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वार स्टंटबाजांवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गटारी अमावास्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टंटबाज बाइकस्वारांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत 2 हजार 317 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागातील सूत्रांनी दिली.


स्टंटबाज दुचाकीस्वारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत रात्री मोकळ्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी स्टंटबाजी सुरू असते. मंगळवारी गटारी अमावास्या आहे. परंतु वीकेंडमुळे मुंबईकर शनिवारपासूनच गटारीच्या मूडमध्ये आहेत. याची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीपासून मोहीम उघडली. यात पूर्व आणि पश्चिम उपनरांतील 26 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. स्टंटबाजी करणारे, रेस खेळणारे, विना हेल्मेट, ट्रीपल सीट्स आणि मद्यपान केलेल्या दुचाकींवर मोहिमेत धडक कारवाई झाली. ही संख्या 2 हजार 317 आहे. अनेकांना दंडाची शिक्षा करण्यात आली तर काहींना अटकही झाली. वांदे्र पश्चिम उपनगरात तब्बल 500 जण कारवाईत सापडले.


मागील आठवड्यात दिल्लीत स्टंटबाजी करणा-या तरुणाला पोलिस गोळीबारात जीव गमवावा लागला होता. त्यानंतर जागे झालेल्या मुंबई पोलिसांनी बाइकस्वारांच्या अशा स्टंटबाजीला वेसण घालण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून शनिवारी मोहिम हाती घेण्यात आली.


अशी झाली कारवाई
1. विना हेल्मेट 1 हजार 287
2. रॅश ड्रायव्हींग 113
3. ट्रीपल सीट 118
4. इतर कारणे 661
5. मद्यपान केलेले 138