आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पोलिसाची पुलावरून उडी मारून आत्महत्या तर औरंगाबादेत आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मागील आठवड्यात वाकोला पोलिस ठाण्यातील हत्या व आत्महत्या प्रकरणानंतरही राज्यात पोलिसांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल कमलाकर धमणसकर यांनी वाशी पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या केली. तर औरंगाबादेत अनिल नरसैया या पोलिस कर्मचा-याने पोलीस निरीक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल नरसैया यांनी स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार केले आहेत. साप्ताहित सुट्टी न दिल्याने नरसैया यांनी हे पाऊल उचलल्याचे कळते. जमादार यांच्यावर सध्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
कमलाकर धमणसकर यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र, घरगुती वादातून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वाशी पोलिसांनी व्यक्त केली आहे. मागील आठवड्यात वाकोला पोलिस ठाण्यात दीपक शिर्के या सहाय्यक फौजदाराने आपले वरिष्ठ विलास जोशी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या व त्यानंतर शिर्के यांनी आत्महत्या केली होती. उपचारादरम्यान विलास जोशी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिस दलातील सावळा गोंधळ व होणा-या आत्महत्या याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बातम्या आणखी आहेत...