आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींच्या घराजवळ चौकी स्थापन्याच्या विचारात पोलिस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅँटिलिया निवासस्थानाजवळ चौकी स्थापन करण्याच्या विचारात पोलिस आहेत. इंडियन मुजाहिदीन अतिरेकी संघटनेने फेब्रुवारी महिन्यात अंबानींना पाठवलेल्या धमकीपत्रानंतर हा प्रस्ताव समोर आला आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणे थांबवावे, तसेच त्या राज्यात मोठी गुंतवणूक करू नये, अन्यथा अ‍ॅँटिलियाचे नुकसान करू असा इशारा मुजाहिदीनने दिला होता. अंबानी यांच्या कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव आला असून औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पोलिस चौकी स्थापन्याचा विचार होऊ शकतो, असे पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले. प्रस्तावित चौकीसाठी मनपाची परवानगी आवश्यक आहे. 27 मजली इमारतीसाठी आवश्यक एसएफआय नसेल तर मनपाने अतिरिक्त एफएसआय मंजूर करणे आवश्यक आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पोलिसांनी यासंदर्भात मनपाशी संपर्क साधला आहे. प्रस्तावित चौकी केवळ अँटालियाच्या नव्हे तर अल्टामाउंट रोड परिसरातील सुरक्षेसाठी असेल.