आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 बुकीला दिलेले पोलिस संरक्षण सरकारने काढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) घातलेल्या धाडीत अटक करण्यात आलेल्या बुकीचे पोलिस संरक्षण राज्य सरकारने शुक्रवारी काढून घेतले. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल जयसिंघानी या बुकीला देण्यात आलेले पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले आहे.

जयसिंघानी याला वर्षभरापूूर्वी आधीच्या लोकशाही आघाडी सरकारने पोलिस संरक्षण पुरवले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहाला माहितीही दिली होती. आधीच्या सरकारनेच बुकीला संरक्षण दिल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती.

या सर्व प्रकाराबाबत गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही ते म्हणाले. चौकशीनंतर या प्रकरणांत पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. आयपीएल सामन्यादरम्यान मॅच फिक्सिंग उजेडात आल्यानंतर ईडीने गेल्या आठवड्यात दिल्ली, मुंबई आणि जयपूर या शहरात छापे टाकले होते. त्यावरुन अनेक संशयित आरोपींना पकडण्यात आले होते. यात जयसिंघानी यालाही अटक करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...