आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील तरुणी बिहारमध्ये आढळली, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केला विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोचहा - महाराष्ट्रातील पालघरमधील एका तरुणीला बिहारमधील एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात बल्थीरसूलपूर (बिहार) पळवून नेले होते. तिच्याशी विवाह करून त्याने तेथे संसार थाटला होता. परंतु शुक्रवारी महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करण्यासाठी जेव्हा येथे आले तेव्हा युवकासह त्याच्या कुटुंबातील सगळेच लोक पळून गेले. त्यानंतर महाराष्ट्र पोलिस तरुणीला सोबत घेऊन गेले.

बोचहा येथील ठाणे प्रमुख अभिषेक रंजन यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलिस येथे युवतीच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन आले होते. त्यांच्याकडे ही युवती बल्थीरसूलपूर गावात असल्याची माहिती होती. त्यानुसार आम्ही त्यांना सहकार्य केले व संबंधित गावात जाऊन त्या युवतीला ताब्यात घेतले. गावातील अरुण महतोचा मुलगा दीपूकुमार पालघरमधील एका कारखान्यात काम करत होता. तो जेथे भाड्याने राहत होता, त्याच्या शेजारच्या अस्मिता नावाच्या एका युवतीसोबत त्याचे प्रेम जुळले. १५ दिवसांपूर्वी तो तिला घेऊन फरार झाला होता. तेथे त्या दोघांनी लग्नही केले होते. याबाबत युवतीच्या वडिलांनी पालघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिस तरुणीच्या शोधासाठी बिहारमध्ये गेले होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...