आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांच्या बदल्यांसाठी आठ मंत्र्यांची समिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी असलेल्या राज्याच्या कायद्यातून पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना वगळण्यासाठी राज्यातील आठ मंत्र्यांची एक उपसमिती सोमवारी स्थापन केली. या समितीच्या अध्यक्षपदी गृहमंत्री आर. आर. पाटील आहेत. ही समिती आता पोलिसांसाठी नव्या नियमांची शिफारस करणार आहे.

राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदलीबाबत वेगळे धोरण राबविण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्याला सोमवारच्या आदेशाने मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या दोन वर्षानंतर करण्याची तरतूद पोलिस कायद्यात होती. राज्य शासनाने 2005 मध्ये त्यांच्या नवा बदल्यांचा कायदा केला. त्यामुळे पोलिस अधिकार्‍यांची बदली तीन वर्षांपयर्ंत करणे शक्य होत नव्हते. याबाबत मंत्रिमंडळात तसेच विधिमंडळातही जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे मागील महिन्यात पोलिस कायदा आणि शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्या अशा दोन्ही कायद्यात योग्य ते बदल करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज आर. आर. पाटील अध्यक्ष असलेल्या आठ सदस्यीय समिती स्थापन झाली.