आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलिसांना मिळणार बीफ डिटेक्शन कीट, 30 मिनिटांत कळेल कशाचे आहे मांस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या ही किट मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये दिली जाणार पुढील टप्प्यात नाशिक आणि औरंगाबादला मिळेल. - Divya Marathi
सध्या ही किट मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये दिली जाणार पुढील टप्प्यात नाशिक आणि औरंगाबादला मिळेल.
मुंबई - महाराष्ट्रात बीफ बॅन आहे मात्र तरीही अनेक ठिकाणी बीफ मिळत असल्याची माहिती होती. यावर राज्य सरकारने नामी तोडगा काढला आहे. महाराष्ट्र पोलिसांना लवकरच बीफ (गोमांस) डिटेक्शन किट्स मिळणार आहेत, यामुळे मांस कशाचे आहे हे केवळ 30 मिनिटांत कळणार आहे. राज्यातील न्यायवैद्यक विभाग (फॉरेन्सिक लॅब) पोलिसांना ही कीट उपलब्ध करुन देणार आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, प्रत्येक किटच्या माध्यमातून कमीत कमी 100 सँपल टेस्ट करता येणार असून 45 फॉरेन्सिक व्हेकल्सववर या किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काय होणार ?
- अधिकारी म्हणाले, जर डिटेक्शन किटने मांसाचा अहवाल पॉझिटिव्ह दिला तर सँपल पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाईल. तिथे डीएनए चाचणीद्वारे तपाणी केली जाईल. 
- फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरचे प्रभारी संचालक डॉ. कृष्णन कुलकर्णी म्हणाले, 'घटनास्थळावर बीफची पडताळणी करण्यासाठी आम्ही एक किट लॉन्च करणार आहे. ही केवळ स्क्रिनिंग टेस्ट असेल, यात पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर सँपल लॅबमध्ये पाठवण्यात येईल.'

कसा होणार फायदा 
- या किटमुळे पोलिसांना घटनास्थळीच मांस तपासता येणार आहे. चौकशीसाठी मांस घेऊन जाणारे वाहन ताब्यात घेण्याची गरज राहाणार नाही. 
- सध्या या किट्स मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरांमध्ये दिल्या जाणार आहे. पुढच्या टप्प्यात औरंगाबाद आणि नाशिक येथे पाठवल्या जाणार आहे. 
- महाराष्ट्रात मांस विक्रीसाठी गोवंश हत्या बंदी आहे. महाराष्ट्र सरकारने पशू संवर्धन कायद्यान्वये हे पाऊल उचलेल आहे. यानुसार बीफची ट्रान्सपोर्ट आणि विक्रीवर बंदी आहे. 
 
कोण-कोणत्या राज्यात आहे गोमांस बंदी 
- जम्मू-कश्मिर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगाना, गोवा, कर्नाटक, तमिळनाडु, आसाम आणि आंध्रप्रदेश येथे गोमांस बंदी आहे. यातील काही राज्यांमध्ये म्हैस आणि बैल यांच्यावर बंदी नाही. मात्र त्यांना स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे किंवा जनावर आजारी असल्यास. 
बातम्या आणखी आहेत...