आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोराच्‍या लग्‍नात पोलिस वऱ्हाडी; स्‍टेजवर केला झिंगाट डान्‍स, मेजवानीवर मारला ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन स्‍नॅचर तौफीक आपल्‍या पत्‍नीसोबत. - Divya Marathi
चेन स्‍नॅचर तौफीक आपल्‍या पत्‍नीसोबत.
मुंबई - गुन्‍हेगारांच्‍या पार्ट्यांमध्‍ये पोलिसांची उपस्थिती ही हिंदी सिनेमाला साजेशी घटना ठाण्‍यात घडली आहे. येथे एका अट्टल चोराच्‍या लग्‍नाला पोलिसांंनी वऱ्हाडी म्‍हणून हजेरी लावली आहे. पोलिस या विवाहास फक्‍त उपस्थितच नव्‍हते, तर स्‍टेजवर जाऊन गुन्‍हेगार आणि त्‍याच्‍या साथीदारांसोबत त्‍यांनी नृत्‍यही केले.   

- ठाण्‍यातील डोंबिवली भागात चेन स्‍नॅचर तौफीक तेजी उर्फ ईरानी याचा विवाह झाला.  
- विवाहामध्‍ये जवळपास 1000 लोक उपस्थित होते. 
- तौफीकवर चेन स्‍नॅचिंगचे 25 गुन्‍हे दाखल आहेत.
- त्‍याच्‍याच नातेवाईकांमधील 15 वर्षीय मुलीसोबत तौफीकचा विवाह झाला.  
- पोलिसांच्‍या माहितीनुसार औरंगाबाद, मुंबई, दिल्‍ली, भोपाळ आणि कर्नाटक येथून शेकडोच्‍या संख्‍येने चोर आणि इतर गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमीच्‍या व्‍यक्ति लग्‍नात सहभागी झाल्‍या होत्‍या. 
 
कोण आहे तौफीक?
- तौफीकवर 2012 साली मोक्‍का अंतर्गत गुन्‍हा दाखल झालेला आहे. 
- त्‍याला अटक झाली तेव्‍हा त्‍याच्‍याकडे मोठ्या प्रमाणात मौल्‍यमान वस्‍तू आढल्‍या होत्‍या. 
- या वस्‍तूंचा हिशोब तौफीकला देता आला नव्‍हता. 
- अटकेनंतर काही दिवसांनी त्‍याला जामीन मिळाला होता.
- मात्र त्‍यानंतर तो पुन्‍हा त्‍याच धंद्यात परतला. 
- 2016 मध्‍ये तौफीकवर पुन्‍हा मोक्‍का अंतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. 
- गुन्‍हा दाखल होताच तौफीक फरार झाला. त्‍यामुळे त्‍याला अटक होऊ शकली नाही. 
- तौफीक तेव्‍हापासून फरार होता. 
 
लग्‍नातच तौफीकला का नाही ठोकल्‍या बेडया?
- पोलिसांनी सांगितले आहे की, 'विवाहावर 20 पोलिस नजर ठेवून होते. तौफीकला तेव्‍हाच अटक केली असती तर कायदा व सुव्‍यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असता कारण विवाहामध्‍ये अनेक गुंड उपस्थित होते.'
- चेन स्‍नॅचिंग विरोधी पथकाचे प्रमुख आणि वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक रविंद्र डोईफोडे यांनी सांगितले की, ' आम्‍हाला फक्‍त लग्‍नात उपस्थित राहून, तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्‍यास सांगितले होते.'
- 'आम्‍ही तौफीकला अटक केली असती तर संरक्षणासाठी त्‍याच्‍या साथीदारांनी तेथे उपस्थित असणाऱ्या महिला व लहान मुलांचा ढाल म्‍हणून वापर केला असता. त्‍यांची सुरक्षितता धोक्‍यात आली असती.'
- ही घटना समोर आल्‍यानंतर ठाण्‍याचे आयुक्‍त परमवीर सिंग यांनी चौकशीचे आदेश‍ दिले आहेत. 
- परमवीर सिंग म्‍हणाले, ' आम्‍हाला या विवाहाबाबत माहिती होती. म्‍हणून आमची एक टीम तेथे तैनात होती. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.' 
 
बेभान होत नाचले पोलिस 
- विवाहास उपस्थित लोकांनी सांगितले की, साध्‍या वेषातील पोलिसांनी वरातीमध्‍ये चांगलेच नृत्‍य केले. 
- स्‍टेजवरही नवरदेवाच्‍या मित्रांसोबत त्‍यांनी मराठी गाण्‍यांवर नृत्‍य केले. यानंतर मेजवानीवर येथेच्‍छ ताव मारला. 
- लोकांनी सांगितले की, विवाहास अनेक अट्टल गुन्‍हेगार उपस्थित होते. मात्र पोलिसांनी त्‍यांच्‍यावर कोणतीही कारवाई केली नाही. 
- यावर पोलिस म्‍हणाले की, 'आम्‍ही फक्‍त तौफकला अटक करण्‍यासाठी आलो होतो. मात्र या विवाहास उपस्थित सर्व गुन्‍हेगारांवर आमचे लक्ष होते.' 
- विवाहानंतर दुसऱ्या दिवशीच तौफीकला अटक करण्‍यात आली.   
 
पुढील स्‍लाईडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ आणि फोटोज.... 
बातम्या आणखी आहेत...