आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Policeman Says Prostitute To A Female Singer At Mumbai.

मुंबई: या बॉलिवूड सिंगरला पोलिस म्हणाला वेश्या, वरिष्ठांकडून चौकशीचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगर वंदना वढेरा (फाईल फोटो) - Divya Marathi
सिंगर वंदना वढेरा (फाईल फोटो)
मुंबई- मुंबईत आरे कॉलनीत राहणा-या एका महिला सिंगरने पोलिसांनी मला वेश्या म्हटल्याचा आरोप केला आहे. आरे कॉलनीतील रॉयल सोसायटीत राहणारी गायिक वंदना वढेरा हिने हा आरोप केला आहे. वंदनाने सांगितले की, मंगळवारी रात्री मी 1 च्या सुमारास मुंबई विमानतळावरून टॅक्सीने घरी परतत होते. त्यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या हेमंत सावंत नावाच्या पोलिस कर्मचा-याने मला वेश्या असे संबोधले. दरम्यान, वंदना यांनी आरोप केल्यानंतर वरिष्ठांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिस कर्मचा-याने कशी केली चौकशी व कसे ठरवले वेश्या....
- वंदना वढेरा आरे कॉलनीतील रॉयल सोसायटी राहते.
- मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता ते मुंबई विमानतळावरून घरी परतत होती.
- घराजवळील नाक्यावर ड्युटीवर असलेल्या हेमंत सावंत नावाच्या पोलिस कर्मचा-याने वंदनाची टॅक्सी आडवली. टॅक्सी आडवून ड्रायव्हरला विचारले की, टॅक्सी कुठे चालली आहे?

- पोलिस शिपाई असलेल्या सावंतने वंदनाला आयडी कार्ड आणि अड्रेस प्रूफ मागितले.
- वंदनाने यावेळी सांगितले की, मी गायक असून, रॉयल सोसायटीत राहते. मात्र, सावंतने विश्वास ठेवला नाही.
- त्यावेळी हेमंत सावंत वंदनाला म्हणाला की, रॉयल सोसायटीत अनेक बॅचलर लोक राहतात. ज्यांना आपण प्रॉस्टिट्यूट (वेश्या) म्हणतो. तू सुद्धा त्यातीलच एक वाटते. मला सर्व काही माहित आहे तेथे काय चालते.
- वंदनाने सांगितले की, जेव्हा मी हेमंत सावंत यांचे बोलणे मोबाईलमध्ये रिकॉर्ड करू लागले तेव्हा नाराज झाला व जोर जोराने ओरडू लागला.
फेसबुकवर अपलोड केला व्हिडिओ...
- या घटनेनंतर तासाभराने वंदना तेथील जवळील पोलिस ठाण्यात गेली व हेमंत सावंत याच्याविरोधात तक्रार दिली.
- वंदनाने तक्रार नोंदवल्यानंतर घटनेचा संपूर्ण विव्डिओ फेसबुक पेजवर अपलोड केला व मिडियाकडे मदत मागितली. अखेर पोलिसांना दखल घ्यावी लागली.

कोण आहे वंदना वढेरा?

- वंदनाचा जन्म लखनौमध्ये झाला व दिल्लीत शिक्षण घेतले.
- वंदना पॉप, क्लासिक रॉक, बॉलिवुड सिंगर आहे.
- वंदना नेहमीच मुंबईतील पेज 3 पार्टीमध्ये दिसून येते.
- वंदनाने अनेक शहरांत स्टेज शो सुद्धा केले आहेत.
पोलिसांचे काय आहे म्हणणे?
- पोलिस उपायुक्त (झोन 12) एम रामकुमार यांनी सांगितले की, आरोपी पोलिस शिपाई हेमंत सावंत आरे कॉलनीतील पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी दुस-या पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.
- या प्रकरणात हेमंत सावंत दोषी आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
पुढे स्लाइड्सद्वारे पाहा, सिंगर वंदना वढेराचे PHOTOS...