आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Policemen In Favor Of Lalit Modi, Disclose Confidential Information

ललित मोदींवर होती पोलिसांची ‘मेहेरबानी’! गोपनीय अहवालातून माहिती उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांना परदेशात जाण्यासाठी मदत करण्याच्या मुद्द्यावरून सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या अडचणीत आल्या आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनीही मोदींना ‘सढळ हाताने’ मदत केल्याची बाब माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांद्वारे उघड झाली आहे.
परदेशातील पैशाचे बेकायदेशीररीत्या व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी), आयकर विभाग यासारख्या यंत्रणांच्या रडारवर असलेल्या मोदींना मुंबई पोलिस विशेष वागणूक का देत होते, यामागे राजकीय वरदहस्त होता का? या दिशेने ईडीने आता तपास सुरू केला आहे.

मोदींमार्फत झालेल्या पैशाच्या व्यवहारात अनियमितता आढळल्याने फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्टनुसार ‘ईडी’ने ललित मोदींना २०१० पासून वारंवार समन्स बजावले. मात्र, अंडरवर्ल्डकडून धमक्या येत असल्याचे कारण देत मोदींनी हजर हाेण्यास नकार दिला. तसेच सुरक्षेसाठी आपल्याला देशाबाहेर जाण्याचा सल्लाही देण्यात आल्याचा दावा मोदींनी ‘ईडी’ला दिलेल्या लेखी उत्तरात केला आहे. यावर असा सल्ला कोणी दिला? अशी विचारणा ईडीने केली असता मुंबई पोलिसांनी सल्ला दिल्याचा खुलासा मोदींचे वकील अॅड. मेहमूद अब्दी यांनी केला होता. विशेष म्हणजे प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या नाेटिसीनंतरही जिवाला धोका असल्याचे कारण देत मोदींनी चौकशी यंत्रणेसमोर येण्याचे टाळले होते.
या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी ईडी आणि प्राप्तिकर विभागाने गुन्हे शाखेचे तत्कालीन सहआयुक्त हिमांशू रॉय यांना पत्राद्वारे विचारणा केली. या दोन्ही पत्रांना दिलेल्या उत्तरात मुंबई पोलिसांनी आपण मोदींना सुरक्षा दिल्याचे स्पष्ट केले आहे. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली असून ही गोपनीय कागदपत्रे ‘दिव्य मराठी’कडे आहेत.

पुढे वाचा.. कारवाई टाळण्यासाठी धमक्यांचा बागुलबुवा