आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Policy Decision On Dance Bar Soon Says R R Patil

डान्सबारबंदीचा धोरणात्मक निर्णय दोन दिवसांत घेणारः आर. आर. पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात डान्सबार बंदीसंदर्भात राज्याचे महाधिवक्ता दरायस खंबाटा व दिल्लीतील नाणावलेल्या विधिज्ञांचा सल्ला घेण्यात आला आहे. त्यानुसार एक-दोन दिवसांत डान्सबारबंदीबाबतचा धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली.

प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वीचा डान्सबार बंदीचा कायदा दोन्हीही सभागृहांत चर्चा होऊनच संमत झाला होता. त्यावेळी फाइव्ह स्टार हॉटेलांमधील डान्सबारचा वापर होत नव्हता. सहा फाइव्ह स्टार हॉटेलांमधील डान्सबारना परवाने देण्यात आले होते, पण त्यांचा वापर करण्यात आला नाही. त्यांनी आपले परवाने परत करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे विधिज्ञांनी या बंदीमध्ये फाइव्ह स्टार हॉटेलांना समाविष्ट करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा डान्सबार बंदीचा निर्णय रद्दबातल ठरवताना नेमक्या याच मुद्द्यावरून आपला निकाल दिला.


उत्तम वकील हवा होता
राज्याच्या गृहमंत्र्यांनी उत्तम वकील देऊन डान्स बंदीविषयक भूमिका उत्तमरीत्या मांडायला हवी होती. पण गृहखाते याबाबत अपयशी ठरले. हा प्रकार जाणूनबुजून तर करण्यात आलेला नाही ना, असा आरोपही नांदगावकर यांनी या वेळी केला.