आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Conflicts Between Rane Family & Sena\'s Vinayak Raut

नीलेश राणेंची ‘डॉक्टरेट’ संशयास्पद- विनायक राऊतांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभेच्या आखाड्यात डॉक्टरेट झालेले नीलेश राणे कुठे आणि 10 वी नापास विनायक राऊत कुठे असा सवाल उपस्थित करणा-या नितेश राणे पिता-पुत्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. नारायण राणेंसह नितेश राणेंनी असे आरोप करताच शिवसेनेचे उमेदवार राऊत यांनी मुंबई विद्यापीठाची 'एमए' राज्यशास्त्र विषयातील पदवी प्रमाणपत्रच भर पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच नीलेश राणे यांची डॉक्टरेट संशयास्पद आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. मी सुसंस्कारित शिक्षण घेतल्यामुळेच खालच्या पातळीवर जाणार नाही. गेलोच तर राणेंची पळता भुई थोडी होईल असा इशारा त्यांनी दिला.
रत्नागिरी-सिंधूदुर्ग मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत हे अशिक्षीत आहेत व नीलेश राणे डॉक्टरेट आहेत अशा प्रकारची टीका राणे पिता-पुत्र करीत आहेत. या टीकेला राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले. राऊत म्हणाले की, उमेदवारी अर्जाचे प्रतिज्ञापत्र भरेपर्यंत मी मुद्दाम थांबलो होतो. माझ्या प्रतिज्ञापत्रातच माझे शिक्षण एम. ए. राज्यशास्त्र असे लिहिले आहे. आता नारायण राणेंना कुठे आरडाओरड करायची आहे ती त्यांनी करावी. खरेतर त्यांना हे सांगण्याकरिता मी बोलत नाही तर पत्रकारांना माहिती देण्याकरिता मी हे बोलत आहे. मी सुसंस्कारित शिक्षण घेतले आहे. सुसंस्कारित शिक्षण घेत असताना मी रामेश्वर विद्यालयाच्या माध्यमातून झोपडपट्टीत राहणार्‍या दोन हजार मुलांना शिक्षण देण्याचे काम करत आहे. नारायण राणेंसारखी इंजिनीअरिंग कॉलेज काढून, डोनेशन घेऊन पैसा उकळत नाही. शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावत नाही, अशी टीका राणेंवर केली.
विनायक राऊत यांनी काय फटकेबाजी केली, वाचा पुढे...