मुंबई - राज्यातील जनता टोलविरोधात रस्त्यावर उतरल्यानंतर आणि विधासभा निवडणुका जवळ आल्याने जनतेला खुश करण्यासाठी टोलनाके रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राज्यामधील एकूण 126 टोलनाक्यांपैकी 44 टोलनाके बंद करण्यात आली आहेत. तर अजून 82 टोलनाके सुरु राहणार असल्याचे अजितपवार यांनी विधानसभेत घोषणा केली.
एसटीची तिकीटवाढ थांबणार
एमएसआरडीसी आणि बांधकाम विभागाच्या सर्व टोलनाक्यांवर आता एसटी बसेलला टोल लागणार नाही. त्यामुळं एसटी तिकिटांच्या दरवाढीला देखील लगाम लागण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये आपली चांगली छबी पाडण्यासाठी करत असल्याचे विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटले आहे.
सरकारला हे 'उशिरा आलेलं शहाणपण' असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लगावला आहे.