आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तचा न्याय साध्वी प्रज्ञा आणि पुरोहितांना का नाही?- उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर आतापर्यंत गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यांचा खटला सुरूही झालेला नाही. तरीही त्यांना पाच वर्षे तुरुंगात सडवत ठेवले आहे. पण अभिनेता संजय दत्तवर गुन्हा सिद्ध झाल्यावरही त्याला पॅरोलवर कसे सोडता, असा सवाल करतानाच गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यात जात, धर्म पाहू नका. न्याय हा सगळ्यांना समानच हवा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारचे वाभाडे काढले.
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संजय दत्तला नियमानुसारच पॅरोल मंजूर झाल्याचे म्हटले आहे. संजय दत्तला मिळालेला वाढीव पॅरोल हा कायद्याप्रमाणे देण्यात आला आहे. कायद्याचे कुठेही उल्लंघन झालेले नाही. पॅरोलबाबत योग्य स्तरावर निर्णय घेतले जातात, त्यात राजकीय हस्तक्षेप नसतो, असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
संजय दत्तला तुरुंग अधीक्षकांनी चारवेळा पॅरोलवर सोडले. साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरील आरोप सिद्ध व्हायचे आहेत. तरीही त्यांना शिक्षा होते, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रकार पाहिल्यावर धर्मांध-जात्यंध कोण? असा प्रश्‍न आमच्या मनात आला तर त्याचे उत्तर काय? न्यायाची पट्टी इकडे अशी तर तिकडे तशी का?.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलेल्या मुस्लिम तरुणांना छळू नका या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. साध्वी प्रज्ञा सिंह आणि पुरोहित यांचे काय? त्यांची बाजू कोण घेणार? की त्यांची बाजू कुणी घ्यायचीच नाही? असा खडा सवालही त्यांनी केला.
संजय दत्तच्या पॅरोलविरोधात याचिका दाखल, वाचा पुढे...