आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यकर्ते ते आणि हे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुफानी गारपीट आणि बेमोसमी पावसाने राज्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असले तरी शासन आणि प्रशासकीय यंत्रणा मात्र निवडणुकीतच मश्गूल आहे. हातातोंडाशी आलेले पीक पार भुईसपाट झाल्याने शेतक-यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले असले तरी ते पुसण्यासाठी पुढे येण्याची तसदी कुणी घेतलेली नाही. मात्र, या उलट चित्र मध्य प्रदेशात पाहावयास मिळाले. तिथेही अशाच प्रकारे शेतक-यांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वत: गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळातील सहका-यांसह अर्धा दिवस उपोषण केले. एकमेकांच्या शेजारी असलेल्या राज्यांतील हे विरोधाभासी चित्र...


मध्य प्रदेश
* केंद्राकडून विशेष आर्थिक मदत प्राप्त करून घेण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सहका-यांसह स्वत: उपोषणास बसले.
* ते पाहता तेथील डॉक्टरांनी आपल्या महागाई भत्त्याच्या थकबाकीतले तब्बल साडेतीन कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले.
* उपोषणादरम्यान चार तासांत एकूण साडेसात कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले.
* राज्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी पाच हजार कोटींच्या विशेष पॅकेजची मुख्यमंत्री चौहान यांची आग्रही मागणी.
* गारपिटीने झालेले नुकसान पाहता ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यासह एकूण पाच मागण्यांवर जोर.