आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण्यांनी महिलांबाबत बोलताना संयम बाळगावा, न्यायालयाने उपटले वाचाळांचे कान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राजकारणी मंडळींनी महिलांबाबत बोलताना संयम आणि सभ्यता बाळगावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. याप्रकरणी न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्यासमोर सुनावणी झाली. वकील पौर्णिमा अडवाणी यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. गेल्यावर्षी राजस्थानमधील एका कार्यक्रमात काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या चारित्र्याबाबत असभ्य टिप्पणी केली होती. अडवाणी यांचे वकील अनुभव घोष म्हणाले, देशात अनेक राजकारणी रोजच महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करतात. त्यामुळे यावर कुठेतरी नियमावली हवी. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय म्हणाले, राजकारणी मंडळींनी महिलांबाबत वक्तव्य करताना तारतम्य बाळगावे, जेणेकरून त्यांच्या आत्मसन्मानाला तडा जाणार नाही. दरम्यान, न्यायालयाने केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाला नोटीस पाठवून दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.
बातम्या आणखी आहेत...