आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेत पुन्हा रिडालोसचा प्रयोग राबवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बिहारमधील पोटनिवडणुकीत नितीश-लालू युतीने भाजपला चीत करत मोदी लाट ओसरल्याचे सिद्ध केल्याने महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपच्या विरोधकांना चांगलेच स्फुरण चढले आहे. त्यामुळे २००९ मध्ये राज्यात राबवलेला रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचा (रिडालोस) प्रयोग आगामी निधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राबवला जाणार आहे.
भाकप, माकप, शेकाप आिण भारिप बहुजन महासंघ यांच्या नेत्यांची मागील आठवड्यात मुंबईत एक बैठक पार पडली. त्यामध्ये छोट्या पक्षांची मोट बांधून महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनिरोधात तिसरा पर्याय उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसऱ्या आघाडी संदर्भात गुरुवारी मुंबईत पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये आघाडीचे नाव, कोणी किती जागा लढवायच्या, नेतृत्व आणि आघाडीतील सामील घटक पक्ष याबाबत निश्चित निर्णय होणार असल्याची माहिती माकपच्या एका नेत्याने दिली.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत रिडालोसने १८२ जागा लढवल्या होत्या. रिपाइंचे रामदास आठवले आणि शेकापचे एन.डी. पाटील यांनी निवडणुकीतील आघाडीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. एकूण १० जागांवर रिडालोसचे उमेदवार निजयी झाले होते.

नवी रि डालोस : भाकप, माकप, लाल निशाण (लेनिन), लाल निशाण (नवे पर्व), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भारिप बहुज महासंघ, शेकाप, जनता दल (से.) यांचा रिडालोसमध्ये समावेश असणार आहे.

मनसेपासून दूर : शेकापने लोकसभेला मनसेशी आघाडी केली होती. परंतु विधानसभेला मात्र मनसे आणि जनसुराज्य यांच्याबरोबर पुरोगामी आघाडी कदापि जाणार नाही, असे जनता दलाचे प्रताप होगाडे यांनी स्पष्ट केले.

आठवले आऊट, आंबेडकर इन : मागच्या वेळी डिलोसमध्ये रामदास आठवले होते. या वेळी ते महायुतीत आहेत. भारिपच्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा लोकसभा निवडणुकीतील ‘एमडीएफ’चा प्रयोग फसल्यामुळे त्यांची गोची झाली आहे. त्यामुळे आंबेडकर यांचे रिडालोसमध्ये सहभागी होणे जवळजवळ निश्चित झालेले आहे.

सर्व जागा लढवणार : रिडालोस विधानसभेच्या किमान २०० जागा लढवणार आहे. यातील सर्वाधिक म्हणजे ६० जागा एकटा शेकाप लढवणार असल्याचे शेकापचे नेते प्रा. एस. व्ही. जाधव यांनी सांगितले.

शेकापच्या हाती सुकाणू : शेकापचे सध्या ५ आमदार असून सहकारातील मोठे नेतृत्व भाई जयंत पाटील (रायगड) या पक्षाचे सरचिटणीस आहेत. त्यामुळे िरडालोसवर शेकापचा वरचष्मा राहण्याची दाट शक्यता आहे.