आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politics Shivsena With Right Wing But Againest Bjp

सहिष्णू हिंदूंच्या बदनामीचा डाव काँग्रेसवरच उलटेल- उद्धव; भाजपविरोध मात्र कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्तेत राहून सरकारला विरोध करायचा व लोकांची वाहवा मिळवायची. एकीकडे शाहरूख खानची बाजू घेऊन कट्टर हिंदुत्त्ववादी भूमिका मांडायची अन् त्याचवेळी भाजपवर हल्लाबोल करायचा अशी गनिमी काव्याची भूमिका उद्धव ठाकरे सध्या लीलया पेलत आहेत. - Divya Marathi
सत्तेत राहून सरकारला विरोध करायचा व लोकांची वाहवा मिळवायची. एकीकडे शाहरूख खानची बाजू घेऊन कट्टर हिंदुत्त्ववादी भूमिका मांडायची अन् त्याचवेळी भाजपवर हल्लाबोल करायचा अशी गनिमी काव्याची भूमिका उद्धव ठाकरे सध्या लीलया पेलत आहेत.
मुंबई- काँग्रेस राजवटीतच धर्माचे राजकारण सुरू झाले व त्यासाठी धर्माधर्मांत आगी लावून राजकीय रोट्या शेकण्याचे प्रकार केले गेले. तेव्हा सहिष्णुतेचे मुडदे पडत असताना हेच काँग्रेसवाले निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना लाथा घालून मुसलमानी लांगूलचालनाची एकही संधी सोडत नव्हते. सहिष्णू हिंदूंना बदनाम करण्याचा डाव काँग्रेस व इतर काही बुद्धीजीवी लोक खेळत आहेत. मात्र हा डाव त्यांच्यावरच उलटेल अशी 'हिंदुत्त्ववादी' भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे, शाहरूख खानची बाजू घेऊन भाजपविरोध कायम ठेवला आहे. केवळ मुस्लिम आहे म्हणून शाहरूखवर टीका करता कामा नये. विचार व्यक्त करण्याचा जेवढा अधिकार इतर भारतीयांना आहे, तितकाच त्यालाही आहे. शाहरुख सुपरस्टार आहे. त्‍याने कधीच धर्माचा वापर किंवा आधार घेतला नाही. शाहरुखला या वादात ओढायला नको, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
देशात असिहष्णू वाढत असल्याची भावना साहित्यिक, विचारवंत व बुद्धीजीवी लोकांत आहे. याबाबत समाजातील विविध स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेता शाहरूख खानने देशात असिहष्णूता वाढत असल्याचे म्हटले होते. यानंतर भाजप नेत्यांनी शाहरूखला देशद्रोही असे संबोधले तर पाकिस्तानात जावे अशा प्रतिक्रिया दिल्या. शिवसेनेने हिंदुत्त्ववादी भूमिका घेतली मात्र भाजप विरोध कायम ठेवला आहे. हिंदुत्त्वावादी भूमिका मांडताना उजव्या विचारसारणींच्या संघटनाना खूष करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मात्र त्याचवेळी भाजपच्या वाचाळवीरांवरही टीका केली आहे. शिवसेनेची एकीकडे कट्टर हिंदुत्त्ववादी भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे त्यांचा भाजप विरोध कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
'सामना'च्या अग्रलेखात देशातील असिहष्णेबाबत भाष्य करताना शिवसेनेने म्हटले आहे की, वास्तविक आजवरच्या काँग्रेस राजवटीतच धर्माचे राजकारण सुरू झाले व त्यासाठी धर्माधर्मांत आगी लावून राजकीय रोट्या शेकण्याचे प्रकार केले गेले. तेव्हा सहिष्णुतेचे मुडदे पडत असताना हेच काँग्रेसवाले निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना लाथा घालून मुसलमानी लांगूलचालनाची एकही संधी सोडत नव्हते. काँग्रेस पक्षाकडे सध्या कोणतीच खास जबाबदारी नाही. त्यामुळे ऊठसूट रस्त्यावर येऊन टाईमपास करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. देशातील वाढत्या ‘असहिष्णुते’विरोधात संसद ते राष्ट्रपती भवन असा एक फुटकळ मोर्चा काढून काँग्रेस नेत्यांनी निषेध नोंदवला. या मोर्चात देशातील काँग्रेसचे बरेच पदाधिकारी सामील झाले होते. स्वत: सोनिया गांधी व राहुल गांधी यांनीच मोर्चा सांभाळल्यावर सर्व चमचे लोक रस्त्यावर उतरणारच. मुळात असहिष्णुतेचे जनकत्व असलेल्या काँग्रेसनेच मोर्चा काढावा हा मोठाच विनोद आहे असे म्हणत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
पुढे आणखी वाचा...काँग्रेसवर कोणत्या शब्दांत केली आहे टीका...