आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजा भट्टचे टि्वट, मनसेचे \'रास्ता रोको\' म्हणजे घाणेरडा प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेचे आजचे टोलविरोधी 'रास्ता रोको' आंदोलन अवघ्या 5-6 तासात गुंडाळले गेले. सामान्य लोकांनीही रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. असे असले तरी सोशल नेटवर्किंग साईटवर प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. मात्र त्याचबरोबर काहीजण त्यावर तिखट प्रतिक्रिया देत आहेत. या तिखट प्रतिक्रियेमध्ये अभिनेत्री पूजा भट्ट हिचाही समावेश आहे. तिने मनसेच्या आजच्या आंदोलनावर सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्र टोलमुक्त कसा काय? असा सवाल विचारत तिने म्हटले आहे की, मनसे कार्यकर्त्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे म्हणजे घाणेरडा प्रकार आहे. आंदोलन करणा-या मनसेच्या कार्यकर्त्यांचे वर्तन ठीक नाही. महाराष्ट्र टोलमुक्त नव्हे गुंडांपासून मुक्त व्हायला हवा आणि त्यासाठीच कोणी तरी आंदोलन करण्याची गरज आहे.
पुढे वाचा, का लक्ष्य केले पूजाने राज ठाकरेंना...