मुंबई/पुणे : टीव्ही रियालिटी शो बिग बॉस-5 मध्ये सहभागी झालेली मॉडल आणि व्हिडीओ जॉकी पुजा मिश्राने बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा पती टिम्मी नारंग आणि त्याचा भाऊ राहुलवर छेडछाडीचा आरोप लावला आहे. पुजाने लावलेल्या आरोपांनुसार टिम्मी उर्फ रोहित आणि त्याचा भाऊ राहुल नारंग यांनी तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. विशेष म्हणजे राहुल पुजाचे मेव्हणे आहेत. या प्रकरणी पुजाने मुंडवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली आहे. पूजाने काही चित्रपटांत आयटम साँग केले असून बिग स्विच आणि युटिव्ही बिंदास सारखे रियालिटी शोमध्येही सहभागी झाली होती.
काय आहेत आरोप
आरोपांनुसार या दोन्ही भावांनी आधी पुजावर तिच्या मुंबईतील घरी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पुजा पुण्याच्या हॉटेलमध्ये गेली होती त्यावेळीही तिला अशा वर्तणुकीचा सामना करावा लागला होता, असा आरोपही पुजाने लावला होता. पण तिने त्याठिकाणाहून पळ काढून मुंबईला गेली होती. आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सध्या पुजाने आपला मुंबईतील फ्लॅट सोडला आहे. सध्या ती एका गुप्त ठिकाणी राहत आहे.
सोशल अकाऊंट हॅक केल्याचा आरोप
उद्योगपती टिम्मी नारंग आणि राहुल नारंग हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मागे लागले असून, धमक्या देत असल्याचे पुजाने म्हटले आहे. या दोघांनी तिच्या फोन बरोबरच सोशल मिडियाचे अकाऊंट हॅक केले असल्याचा आरोपही चिने लावला आहे. तसेच तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी काही लोक तिचा पाठलाग करत असल्याचेही पुजाने सांगितले.
फोटो : अभिनेत्री पूजा मिश्रा (उजवीकडे), अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि तिचा पती टिम्मी नारंग