आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाड: हा \'देवदूत\' रस्‍त्यावर उभा नसता तर, शेकडोंना मिळाली असती जलसमाधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाड (रायगड)- महाडच्या सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने दोन बस व इतर काही वाहने वाहून गेले आहेत. यातील बरेच प्रवासी अजूनही बेपत्‍ता आहेत. याच दुर्घटनेच्‍या वेळी शेकडो लोकांचे प्राण वाचवणारा एक देवदूत धावून आला. या देवदुताचे नाव बसंत कुमार.
- महाडचा ब्रिटीशकालीन पूल जेथे सुरु होतो, त्याला चिटकून बसंत कुमारचे गॅरेज आहे.
- पंक्चर काढणे, हायवेवर वाहने बंद पडली तर त्यांच्या मदतीसाठी समोर येणे हे बसंतचे काम.
- ही दुर्घटना झाली तेव्हा हाच बसंत देवदूताच्‍या रुपात लोकांच्‍या मदतीसाठी धावून आला.
- दोन बसेस पुलासकट नदीत वाहून गेल्‍याचे बसंतकुमारे पाहिले.
- ही घटना त्‍याच्‍यासाठी काळीज धस्‍स करणारी होती. त्यातून सावरत तो रस्त्यावर आला.
- मागून येणा-या वाहनांना त्‍याने राखून धरले.
- बसंतकुमार रस्‍त्यावर उभा नसता तर, शेकडो लोकांना जलसमाधी मिळाली असती.
मंगळवारी रात्रीची घटना..
मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूरदरम्यान (कोकण) सावित्री नदीवर असलेला जुना पूल मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. यात राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस वाहून गेल्या. चालक-वाहकांसह एकूण 22 प्रवासी बेपत्ता आहेत. या तुटलेल्या पुलावरून इतर 13 वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, बसंतकुमारने काय केले..
बातम्या आणखी आहेत...