आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणित विषय जादुई करण्यासाठी इंजिनिअरचे ‘मिशन’, शिकवण्यासाठी ८०० जणांचा ताफा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गणितहा नवनव्या कल्पना जन्माला घालणारा विषय आहे. मात्र, शिकवण्याच्या जुनाट पद्धतीने हा विषय नावडीचा बनला आहे. हा समज बदलण्यासाठी अाणि गणितामधील जादू दाखवण्यासाठी मुंबईतला एक इंिजनिअर धडपडतो आहे. गेल्या दहा वर्षांत या अवलियाने देशातील लाखो बालक-पालक-अध्यापकांची गणिताशी गट्टी जमवून िदली आहे.
रूपेश गेसोता हा मुंबईतला इलेक्ट्राॅनिक इंिजनिअर. मल्टिनॅशनल कंपनीत गलेलठ्ठ पगारावर काम करत होता. अापण कुणासाठी काय काम करतो, हे प्रश्न त्याला अस्वस्थ करत होते. मुंबईत हजारो मुले शाळाबाह्य असल्याचे त्याच्या लक्षात आले अाणि नोकरी सांभाळत त्याने शाळाबाह्य मुलांना िशकवायचा ध्यास धरला. एेरोलीमधल्या डंपिंग ग्राउंड परिसरातल्या मुलांना तो िशकवू लागला. त्यांना पालिका शाळेत प्रवेशही मिळवून दिला. काम जसं वाढत गेलं, तशी मनुष्यबळाची गरज वाढली. व्हाल्युंटिअर िमळवण्यासाठी नेटची मदत झाली. हौसिंग सोसायटीत जाहिराती लावल्या. त्यातून अनेक िनवृत्तीधारक, गृहिणींनी या कामी सहकार्य केले. काॅलेजमधले तरुणही सहभागी झाले. पाहता पाहता ८०० व्हाॅल्युंटिअरांचा ताफा एेरोलीत उभा राहिला. प्रत्येक जण आठवड्यातील दोन तास िशकवायला येत होता. काही काळानं ही मुले मध्येच शाळा साेडत असल्याचे लक्षात आले. मग मुलांंच्या पालकांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न सुरू केला. त्यांना एेराेलीतच कामे िमळवून िदली. काम वाढत होते. आता यात पूर्णवेळ पडण्याची गरज होती. मात्र, नोकरी सोडली तर घर चालवायचं कसं, हा प्रश्न होताच. काहींनी स्वयंसेवी संस्था स्थापण्याचा सल्ला िदला. काहीही झालं तरी एनजीओ काढायची नाही, पगारी स्वयंसेवक व्हायचे नाही, असा निश्चय होता. चांगल्या शाळांतील िवद्यार्थ्यांचं गणित फार कच्चं असल्याचं लक्षात आलं. मग त्यात काही करता येतं का याचा अंदाज घेतला. मुंबई, ठाणे, पालघरमधल्या शेकडो शाळांना भेटी िदल्या. हजारो िशक्षकांशी संवाद साधला. गणित िशकवण्याच्या जगभरच्या प्रयोगांचा अभ्यास केला अाणि गणित िशकवण्याची भारतीय पद्धतच चुकीची असल्याचा निष्कर्ष काढला.

गणित िशक्षकांच्या कार्यशाळा घेण्याचा िनर्णय घेतला. त्यासाठी ‘लीड’ नावाची अनौपचारिक संस्था उघडली. ‘फन वुईथ मॅथ्स’ या धर्तीवर कार्यशाळा घेतल्या. त्याला चांगला प्रतिसाद िमळू लागला. पालकांसाठीही कार्यशाळा सुरू केल्या. दर्जात्मक गणित िशकवण्याच्या या कार्यशाळांचा बोलबाला झाला. सुरत, अहमदाबादमधूनही गेसोता यांना अामंत्रणे येऊ लागली. अशा प्रकारे एनजीओ स्थापन करताही पोटापाण्याचा प्रश्न सुटला. गेसोता यांच्या कार्यशाळेत पाच वर्षांत दहा हजार शिक्षक िततकेच पालक दर्जात्मक गणित िशकवण्याच्या पद्धती िशकून गेलेत. माझ्या कार्यशाळेतल्या िशक्षक-पालकांच्या हातून उद्याचा आइनस्टाइन जन्म घेणार आहे, असा या ध्येयवेड्या रूपेश गेसोता यांना आत्मविश्वास आहे.

रूपेश गेसोता यांच्या टिप्स
{गणिताचंकेवळ उत्तर नको, त्याची प्रक्रिया िशकवा. {सूत्रांऐवजी व्यावहारिक गणित िशकवा. { प्रत्येक िवद्यार्थी एक आयडिया आहे. { नवं काम हाती घेण्यासाठी पदवी, संस्थेची गरज नाही. { वैयक्तिक समस्या कधीच संपत नसतात. { काम चालू करा, लोक िदल आैर जेब खोल देंगे. { शंभरांना िवनंती कराल तेव्हा एक हो म्हणेल. { लोकांशी अॅप्रोच होण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ उठवा. {एनजीओमधला पगार सीएसआयआरमधून येतो. { जेव्हा तुम्ही पगारी समाजसेवक व्हाल तेव्हा तुमच्यातले कार्यकर्तेपण ठार होईल.
बातम्या आणखी आहेत...