आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप- शिवसेनेत पोस्टर वॉर, उद्धव ठाकरेंना पप्पूसह बेडकाची उपमा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपने प्रथमच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल करीत त्यांना बेडकाची उपमा दिली आहे. - Divya Marathi
भाजपने प्रथमच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल करीत त्यांना बेडकाची उपमा दिली आहे.
मुंबई - सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना- भाजपमधील ‘विळ्या- भाेपळ्या’चे सख्य सर्वश्रूतच अाहे. शिवसेनेकडून सतत अपमान होत असल्याने संतप्त असलेल्या भाजपा समर्थकांनी अखेर शिवसेनेला त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देऊन हा वाद अाणखी पुढे नेला अाहे. पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन दहशतवादावर बोलतात ही उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि ‘हे निजामाचे सरकार आहे का’ या संजय राऊत यांच्या प्रश्नाला भाजपने साेशल मीडियातून चाेख उत्तर दिले अाहे. ते झाेंबलेल्या शिवसैनिकांनीही पुन्हा वाकबाण साेडले अाहेत.
विधानसभा निवडणुकीत ताेडलेली युती व मंत्रिमंडळात दिलेले दुय्यम स्थान यामुळे शिवसेना गेल्या दीड वर्षांपासून भाजपवर चिडलेली अाहे. त्याचे पडसाद अधूनमधून शिवसेनेच्या मुखपत्रातून उमटत असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊनही उद्धव ठाकरेंची भेट घेतली नव्हती, त्यावेळी शिवसैनिकांनी हा अपमान समजून यापूर्वीही भाजपचे ज्येष्ठ नेते कसे बाळासाहेब ठाकरेंसमाेर झुकले हाेते, हे पाेस्टरमधून दाखवत भाजपला डिवचले हाेते. तसेच स्वत:ला ‘सिंह’ म्हणवणाऱ्या भाजप नेत्यांचाही ‘सामना’तून समाचार घेतला हाेता.

दाेन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘हे निजामाच्या बापाचे सरकार’ अशी टीका केली हाेती. तर माेदींनी परदेशातील दहशतवादाबाबत केलेल्या वक्तव्याचीही उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली हाेती. या प्रकारामुळे संतापलेल्या भाजप समर्थकांनी शुक्रवारी व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकेची झाेड उठवली. ज्या व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे विराेधकांची खिल्ली उडवत असत त्याच माध्यमाचा वापर भाजपने केला. एका पाेस्टरमध्ये उद्धव ठाकरे यांना बेडूक दाखवले तर एका पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे चित्र काढून ‘महाराष्ट्रातील पप्पू’ अशी खिल्ली उडवण्यात अाली. तसेच ‘देश पिताश्रींच्या पुण्याईवर आणि मातोश्रीच्या आशीर्वादाने नाही चालत, त्यासाठी खऱ्याखुऱ्या संकटाचा सामना करावा लागतो,’ असा टाेलाही पाेस्टरद्वारे साेशल मीडियातून लगावण्यात अाला.
माेदींचा उल्लेख ‘गद्दार’
भाजपच्या टीकेमुळे संतापलेल्या शिवसैनिकांनीही पुन्हा ‘पाेस्टर अस्त्र’ बाहेर काढत माेदींना टार्गेट केले अाहे. ‘अायत्या बिळात नागाेबा, गद्दार, शिवसेनेचे उपकार विसरलात, चूरण बाबा, अच्छे दिनला लाेकच देतील उत्तर’ असा मजकूर असलेले व माेदींचे व्यंगचित्र असलेली पाेस्टर्स साेशल मीडियातून फिरवली जात अाहेत. दुसरीकडे मेट्रो-३ वरून आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेने नाराज कार्यकर्त्यांनी गिरगावमध्ये रास्ता रोको करत शेलार यांचा पुतळाही जाळला. या भाजप-शिवसेनेतील वाद आता टोकाला गेला असून भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, भाजपने प्रथमच शिवसेनेवर कसा केला आहे मार्मिक हल्लाबोल...
यासोबत पुढे वाचा, संजय राऊतांच्या टीकेने भाजपे पित्त खवळले...
बातम्या आणखी आहेत...