आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटरी चाेरीमुळे काेलमडली पश्चिम रेल्वेची वाहतूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माहीम रेल्वेस्थानकाजवळील विद्युत उपकेंद्रातील तब्बल १८ बॅटरी चाेरीला गेल्यामुळे साेमवारी अाठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला. वीज पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सकाळी साडे अकराच्या सुमारास एेन गर्दीच्यावेळी दादर स्थानकावरील चारही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. दुपारी साडेबारा वाजता बिघाड दुरुस्त करण्यात अाला, तरी ६० उपनगरीय सेवा रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे काेलमडून गेले हाेते.

सकाळी पाऊस पडल्याने अाेव्हरहेड वायरमध्ये बऱ्याचदा विजेचा पुरवठा काही सेकंद बंद हाेताे. त्याप्रमाणे सकाळी साडेअकराच्या सुमारास अाेव्हरहेड वायरमध्ये तांित्रक बिघाड झाल्यानंतर पुढच्या पंधरा मिनिटात नेमका बिघाड शाेधून युद्धपातळीवर त्याची दुरुस्ती करून लाेकलसेवा पूर्ववत करण्यात येईल असे पश्चिम रेल्वेने टि्वट केले हाेते. पण नंतर माहिम येथील विद्युत उपकेंद्रातून बॅटरी बाॅक्स चाेरीला गेल्यामुळे हा प्रकार घडल्याचे रेल्वे प्रशासनाला अाढळून अाले. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ट्रिपिंगमुळे विद्युत यंत्रणेला धाेका पाेहचू नये यासाठी सर्किट ब्रेकर स्विचेस रिमाेटने सुरू केले जाते. हे सर्किट ब्रेकर स्विचेस बंद करण्यासाठी लागणारी वीज विद्युत उपकेंद्रात असलेल्या बॅटरीमधून वापरली जाते. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर बॅकअप म्हणून या बॅटरीचा उपयाेग करण्यात येत हाेता . माहिम येथील विद्युत उपकेंद्रातून १२० एएच क्षमतेच्या १८ बॅटरी चाेरीला गेल्यामुळे अाेव्हरहेड वायर भार घेऊ शकत नव्हता. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने सव्वा बारा ते साडेबारा वाजेदरम्यान अाेव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा सुरळीत केल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली. या १८ बॅटऱ्यांच्या चाेरी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील चाैकशी करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...