आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prabhakar Deshmukh Asks Question To Ajit Pawar Over Distribution Of Water

राष्ट्रवादीचे आमदार शिंदेंना पाणी कसे देता: आंदोलक प्रभाकर देशमुख यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांची साखर कारखानदारी सुरळीत राहण्यासाठी अजित पवार उजनीच्या उजव्या व डाव्या कालव्यावर असणा-या शेकडो गावांच्या तोंडचा घोट पळवत असल्याचा आरोप सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सोमवारी केला. कालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ‘वर्षा’ बंगल्यासमोर उपोषण करणार आहेत.

5 फेब्रुवारीपासून जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मंत्रालयावर घागर मोर्चा नेला, तसेच गळफास आंदोलनही केले. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे गेल्या 65 दिवसात या संघटनेने 42 निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांनी दोनदा भेट घेतली.

कोण आहेत देशमुख
प्रभाकर ऊर्फ भय्या देशमुख पाटकूल (ता. मोहोळ) गावचे शेतकरी आहेत. 5 वर्षांपूर्वी त्यांनी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटना स्थापन केली. मोहोळ तालुका पंचायत समितीचे ते सदस्य असून भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालकही आहेत.