आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव सामना: अाॅस्ट्रेलियाच्या पहिल्या दिवसअखेर ५/३२७, स्मिथ, मार्शचा झंझावात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अाॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ (१०७) अाणि शाॅन मार्शने (१०४) शुक्रवारी भारत अ संघाविरुद्ध  तीन दिवसीय सराव सामन्यात झंझावाती खेळी केली.  या दाेघांच्या शतकी खेळीच्या बळावर अाॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२७ धावा काढल्या. अाता मिशेल मार्श (१६) अाणि मॅथ्यू वेड (७) दाेघे मैदानावर खेळत अाहेत.  
 
भारताकडून युवा गाेलंदाज  नवदीप सैनीने २ गडी बाद केले. कर्णधार हार्दिक पंड्याने १ बळी घेतला. येत्या २३ फेब्रुवारीपासून भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील कसाेटी मालिकेला सुरुवात हाेईल. या मालिकेच्या तयारीसाठी मुंबईमध्ये चारदिवसीय सराव सामन्याचे अायाेजन करण्यात अाले आहे.  
 
या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार हार्दिक पंड्याचा हा निर्णय नवदीप सैनीने याेग्य ठरवला. त्याने झटपट सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर (२५) अाणि रेनेशाॅ (११) या दाेघांना तंबूत पाठवले. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाची निराशाजनक सुरुवात झाली. वाॅर्नरने ३० चेंडूंत ४ चाैकारांसह २५ धावांची खेळी केली. तसेच रेनशाॅने ४१ चेंडूंत ११ धावा काढल्या. त्यानंतर अालेल्या कर्णधार स्मिथने संघाचा डाव सावरला. त्याने भारताच्या युवा गाेलंदाजांचा खरपूस समाचार घेताना शानदार शतक ठाेकले. या वेळी त्याला मार्शची माेलाची साथ मिळाली. 
 
स्मिथ, मार्शची फटकेबाजी
अाॅस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ अाणि शाॅन मार्शने तिसऱ्या गड्यासाठी १५६ धावांची माेठी भागीदारी रचली. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. या दाेघांनी दरम्यान तुफानी फटकेबाजी करताना वैयक्तिक शतकेही झळकावली. स्मिथने १६१ चेंडूंचा सामना करताना १२ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे १०७ धावा काढल्या. तसेच मार्शने १७३ चेंडूंमध्ये १०४ धावांची खेळी केली. यामध्ये ११ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. ही दाेघेही रिटायर हाेऊन तंबूत परतले.
 
नवदीप सैनीचे दाेन बळी
भारत अ संघाचा युवा गाेलंदाज नवदीप सैनी चमकला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना २ विकेट घेतल्या. त्याने सलामीवीर वाॅर्नर अाणि रेनशाॅला बाद करून संघाला महत्त्वाचे दाेन बळी मिळवून दिले. तसेच कर्णधार हार्दिकने १  विकेट घेतली. इतर गाेलंदाजांना मात्र अापली छाप पाडता अाली नाही.  
 
हँडसकोम्ब चमकला
हँडसकोम्बने  ४५ धावांची  खेळी केली. त्याने ७० चेंडूंमध्ये ३ चाैकारांच्या अाधारे ४५ धावा काढल्या.  त्याला  मार्शला  साथ दिली. त्यांनी  चाैथ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली.
 
बातम्या आणखी आहेत...