आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prakash Ambedkar Again Try To Take Claim Of People's Education Society

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पीपल्स’चा ताबा घेणारच : आंबेडकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आपली निवड धर्मादाय आयुक्तांनी कायदेशीर ठरवलेली आहे. त्यामुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ताबा घेण्यापासून आपणास कोणीच रोखू शकत नाही. चार दिवसांनी परत आपण ‘पीपल्स’चा ताबा घेण्यासाठी जाणार, अशी भूमिका बाबासाहेबांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक दादर येथील आंबेडकर भवनमध्ये मंगळवारी पार पडली. त्यामध्ये अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते.
‘आपण गुंडागर्दीचा मार्ग कधीच चोखाळला नाही. धर्मादाय आयुक्तांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीवरील आपली निवड कायदेशीर ठरवली आहे. उलट पोलिस न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजवणी करत नाहीत,’ असा आरोप ‘भारिप’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘पोलिसांनी धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी सात दिवसांची मुदत मागितली आहे. त्यानंतर आपण पोलिसांच्या उपस्थितीत पीपल्स सोसायटीमध्ये जाऊन कायदेशीरपणे ताबा घेणार आहोत.’ पोलिसांनी ‘भारिप’च्या कार्यकर्त्यांवर केलेल्या लाठीमाराची आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचेही या वेळी आंबेडकर यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मालकीवरून सध्या वाद सुरू आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे कार्यकर्ते शुक्रवारी सोसायटीच्या कारभाराचा ताबा घेण्यासाठी फोर्टमधील कार्यालयात गेले होते. सोसायटीवर ताबा असणारे डॉ. डी. जे. गांगुर्डे आणि माजी मंत्री अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर यांनी कार्यालयाचे दरवाजे बंद केले. पीपल्स एज्युकेशन संस्था सध्या ‘आरपीआय’चे अध्यक्ष रामदास आठवले गटाच्या ताब्यात आहे.
‘आंबेडकरी जनता कायद्याने जाते’
‘आंबेडकरी जनता नेहमीच कायदेशीर मार्गाने जाते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर मात्र गुंडागर्दी आणि ठोकशाही मार्गाने पीपल्स एज्युकेश संस्थेचा ताबा घेण्यास निघाले आहेत,’ असा आरोप ‘आरपीआय’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे.